शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

 हाॅटेलात चालत होती 'रंगरलिया': दोन अप्सरांसह तीन पोपट  पिंजऱ्यात कैद  

पोलीसांच्या कारवाईने निर्माण झालेला "राजयोग" उध्वस्त..!

अहमदनगर- नगर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,येथील एका कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला असून ५ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      एकीकडे हनी ट्रॅपींगच्या नावाने नगर जिल्हा बदनाम झालेला असतानाच आता मात्र वेश्या व्यवसायही काही हाॅटेलातून सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. काही नामांकित पुढार्यांच्या हाॅटेलवर असे धंदे होतांना दिसत आहे. आता मात्र हे नवीन प्रकरण समोर आल्याने नगर शहरात नवी चर्चा सुरु झाली आहे. पोलीस बेकायदा धंद्यांना आळा घालण्यास सक्षम अपयशी आल्याचे चित्र दिसुन येत आहे. वारंवार होणारे महिला मुलींवरील अत्याचार, बेकायदा गांजा विक्री, सर्रास गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, गोमांस अशा अनेक गुन्ह्यांनी शहरासह जिल्ह्याला विळखा घातलेला असून कायद्याची भिती या गुन्हेगारांना राहिलेले नाही याचे कारण अर्थपूर्ण सबंध आहे का...?असा सवाल जनसामान्यांत उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि खंडाळा गावच्या शिवारात अक्षय कर्डिले याच्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला.यासंदर्भात नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार जब्बाद रहिमखो पठाण यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये 


अक्षय अनिल कर्डिले (वय 25),

सौरभ अनिल कर्डिले (वय 21),

संदीप पंडित जाधव (वय 23, सर्व रा. खंडाळा, ता.जि. अहमदनगर),

विकी मनोहरलाल शर्मा (वय 29, रा. आझादनगर, ता.जि. अहमदनगर)

गणेश मनोहर लाड (वय 21, रा. वाळकी, ता.जि. अहमदनगर)

यांचा समावेश आहे.

       अक्षय कर्डिले याच्या मालकीचे हॉटेल राजयोग आहे, त्याठिकाणी आरोपी कुंटणखाना चालवत होते. मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नगर तालुका पोलिसांनी खंडाळा गावच्या शिवारातील हॉटेल राजयोग येथे छापा टाकला आहे.आरोपी हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता महिला व मुलींना देह विक्री करण्यासाठी बोलवून घेत. त्या महिला व मुलींकडून गैरमार्गाने देहविक्री करून कुंटणखाना चालवत होते. 


पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे व पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.

सहदेव जाधवः

संपादकः राजयोग मानस वृत्त पोर्टल, साप्ताहिक, व राजसत्ता न्युज

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच