सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "जिवन साधना गौरव" पुरस्कार

केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य दादा इदाते यांचे हस्ते पुरस्कार प्रदान अकोले- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "जिवन साधना गौरव" पुरस्कार माजी आदिवासी विकासमंञी मधुकरराव पिचड यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य श्री. भिकूजी (दादा) इदाते यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ.कारभारी काळे हे होते. प्र.कुलगुरू डाॅ.संजीव सोनवणे आणि कुसचिव डाॅ.प्रुफुल्ल पवार, सुनेत्राताई पवार, माजी आमदार नंदकुमार झावरे, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्य दिग्दर्शिका मनीषा साठे, माजी आमदार वैभवराव पिचड हे उपस्थित होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना दिलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे कि, कळसूबाईचे शिखरयात्री, अहमदनगर जिल्ह्यातील जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ, अकोले तालुक्याचे पितामह भाग्यविधाते, माळरानावर हिरवाई फुलविणारे जलक्रांतीचे द्रष्टा नेते, तरुणांचे आधारस्तंभ, आदिवासी विकासाचे शिल्पक...