पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड
पंतप्रधान उज्वला गॅस मार्फत साकूर पठार भागातील महिलांची दिवाळी गोड साकूर प्रतिनिधीः साकुर इंण्डेन्स गॅस ग्रामीण वितरक एजन्सी मार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजू व गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन चे वाटप आज जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास सभापती मीराताई शेटे यांच्या हस्ते देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की साकुर ग्रामीण इंडियन्स गॅस वितरण यांच्यामार्फत पंतप्रधान उज्वला गॅस योजना योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना आज गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती सौ.मीराताई शेटे यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंडियन गॅस चे संचालक उत्तम पाटील खेमनर मांडवे गावचे माजी सरपंच जगदीश पाटील गागरे, सुधीर जाधव, पारनेर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पांडुरंग गागरे, तसेच जांबुत गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भागवत, किसन शेटे, पोपट गाढवे, सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी रवी अण्णा वाडेकर, रावसाहेब गागरे, दत्तात्रय खामकर, बाजीराव गागरे आदी मान्यवर उपस्थित होते....