संगमनेर नगरपालिका निवडणूक: तांबे थोरात विरुद्ध खताळ विखे अशीच रंगणार
निवडणूक अखेर काल राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम जाहीर झाला. दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 10 नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज भरण्यास सुरुवात तर 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवार उमेदवारी अर्ज भरू शकता. 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आणि इकडे इच्छुकांनी दंड थोपटली आहेत. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आजी माजी आमदार यांच्या गटातच संघर्ष होईल असे चित्र दिसत आहे. महायुती कडून सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष स्वतः आ. अमोल खताळ आहेत. तर महाविकास आघाडी मात्र अजून वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे. त्यांची निवडणुक रणनीती अद्याप समोर आली नाही मात्र आमदार सत्यजित तांबे यांच्या सौभाग्यवती मैथिली तांबे या रणांगणात उतरतील अशी चर्चा ...