वाळू तस्कर व तो स्वीय सहाय्यक
संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू तस्करीला पुन्हा सुगीचे दिवस... साकूर पठार भागातील मांडवे गावात पकडला ग्रामस्थांनी वाळूचा डंपर... आज सकाळीच मुळा नदीतून अवैध रित्या वाळू भरून चाललेला डंपर काही ग्रामस्थांनी पकडला. त्यामुळे पठार भागात वाळू रॅकेट पुन्हा सुरु झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. साकूर पठार भागात मुळा नदीवरून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. विशेष म्हणजे हे वाळू तस्कर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाखाली ही तस्करी करत असल्याचे आढळून येत आहे. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे व ते फोटो आपल्या स्टेटस ला ठेवायचे आणि नागरिकांना व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मी नेत्याचा खूप जवळील आहे असा दबाव निर्माण करायचा असा नवा फंडा साकूर भागातील तस्करांनी सुरु केल्याचे निदर्शनास येत आहे. काही दिवसांपासून साकूर गटात कायद्याची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यातच अवैध धंदे करणाऱ्यांची राजकीय नेत्यांशी वाढलेली जवळीक संशयास कारण ठरत आहे. अवैध धंदा करणाऱ्यांचा फोटो थेट मोठ्या राजकीय नेत्यांच्या बरोबर झळकत असल्याने कायाद्याची ऐसी की तैसी असे चित्र हे तस्कर उभे करत आहेत. काही दिवसांप...