संगमनेर भाजपात उभी फूट पडण्याची श्यक्यता सर्वसामान्य कार्यकर्ता दुर्लक्षित होत असल्याची खंत

विखे हाच आमचा पक्ष व विखे हेच आमचे सरकार: पण चांडाळ चौकटीला वैतागलो संपादकीय भाजप नेतृत्वाला उद्विग्न कार्यकर्त्याची आर्त साद संगमनेर तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीला सर्वसामान्य कार्यकर्ता वैतागून गेला असून लवकरच पर्याय शोधत असल्याचे खात्रीशीर वृत्त राजसत्ता न्यूजच्या हाती लागले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या चमकोगिरीला कार्यकर्ते पुरते वैतागले आहेत. दिलेले कामे वरिष्ठान पर्यंत जाणून बुजून पोहचवले जात नसल्याचा आरोप काही कार्यकर्ते खाजगीत बोलताना करत आहेत. काही जुने जाणते कार्यकर्ते मात्र या फंदात न पडता अलिप्त राहणे पसंद करत आहेत. संगमनेर तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांचा एक हुकमी अंमल आहे. तो छेदने इतके ही सोपी गोष्ट नाही. त्यातच राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीने उलथापालथ झाली आहे ती बघता तालुक्यात देखील मोठा भूकंप होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. काही पदाधिकारी जनतेत जाऊन पक्ष्याची भूमिका मांडत आहेत तर काही मात...