Posts

Showing posts from October 11, 2025

खून प्रियकराचा

अखेर त्या तरुणाचा खुनच... अनैतिक संबंधातून केला प्रियेशी ने खून... विवाह बाह्य संबंध... मद्य आणि मदिराचा संगम.. भेळ भत्ता ही आणला जोडीला. भल्ला मोठा दगड उशाला.. प्रियंकाराला तेथेच संपावला.... खून करून प्रियेशी ने ठोकली धूम.. घारगावचे पोलिसांनी आणली शोधून...मृत्यु मागचे हेच रहस्य संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे एक मृतदेह आढाळला होता.आता या तरुणाचा खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५) रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी जि. अहिल्यानगर या इसमाचा खून अनैतिक संबंधातून प्रियेशी ने केला असल्याची माहिती घारगाव पोलिसांनी दिली आहे. या प्रियेशी महिलेला 24 तासात अटक करण्यात घारगाव पोलिसांना मोठं यश मिळाले आहे.  मांडवे बुद्रुक गावातील शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट ने महसूल च्या जागेत अनधिकृत अतिक्रमण केले आहे. याच जागेत हा खून झाला आहे. त्यामुळे येथे झालेले अनधिकृत बांधकाम नक्की काय कामासाठी वापरले जाते याचा संशय निर्माण होत आहे. या ठिकाणी सरकारचा निधी लाटून या अनधिकृत जागेत या ट्रस्ट ने भक्तनिवास बांधले आहे पण या भक्तनिवास चा उपयोग नक्की कशासाठी होतो हे मात्...

अवैध दारु विक्रेता

Image
स्थानिकांवर तलवार काढून व मिरची पूड फेकून अवैध दारू विक्रेत्याची नाशिक पुणे हायवे वर फिल्मी स्टाईल राढा घारगाव पोलिसांची सौम्य भूमिका.. अवैध धंद्याना पाठीशी कुठपर्यंत घालणार..जनतेतून सवाल संगमनेर तालुक्यातील पठार भागात बोटा ग्रामपंचायत हद्दीत आळे खिंडीत एक साकुरकर ड्राइवर ढाबा नावाचे हॉटेल आहे. या ढाब्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होतं होती. तसेच या हॉटेल मालकाची दहशत अनेक दिवसांपासून वाढली होती. याचा त्रास स्थानिक ग्रामस्थांसह प्रवास्यांना होतं होता. यामुळे त्रासलेल्या ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांना येथील अवैध दारूची माहिती दिली. व मोठ्या प्रमाणात दारू साठा यावेळी पोलिसांना हस्तगत करून दिला आहे. सदर हॉटेल चालक हा सेवानिवृत्त फौजी आहे. त्यामुळे बोटा गावातील लोक त्याच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत होते परंतु दिवसेंदिवस येथील वातावरण कलुशीत झाले होते.  अवैध दारू विक्री, ड्राइवर लोकांना मारहाण करणे, धमकी देणे, तलवार काढून जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार घडत होते. यावेळी गावातील काही सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवला. सदर गावातील काही तरुणांनी याविरोधात...

जेल मध्यी आरोपी युसुफ चौघुले याचे इनोव्हा कार मध्ये लाखो रुपयाचा गुटखा जप्त

Image
जेलमध्ये असूनही युसुफ दादा चौगुले करतो आहे गुटख्याची तस्करी आज त्याच्या इनोव्हा कार मध्ये लाखो रुपयाचा गुटखा घारगाव पोलिसांकडून जप्त.. घारगाव पोलिसांनी सापळा लावून हा लाखो रुपयांचा गुटखा पकडला आहे. यात एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी मात्र पसार झाला आहे.          आज दि. 14/10/2025 रोजी दुपारी 2-30 वा. सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गोपणीय माहिती मिळाली.  सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, यांनी पोलीस उप निरीक्षक अजय कौटे, पोहेकॉ नारायण ढोकरे, पोकॉ सुभाष बोडखे, पोकॉ प्रमोद गाडेकर, पोकॉ महादेव हांडे, या घारगांव पोलीस स्टेशन च्या पथक नेमवून सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी पाठविले. यावेळी साकुर फाटा ते साकुरचे दिशेने साकुर कडे एक ग्रे रंगाची इनोव्हा क्रिस्टा क्रमांक एम.एच.17 बी.एक्स 0097 ही जात होती. या गाडीतून प्रतिबंधीत गुटखा अवैध रित्या बंदी असलेला पदार्थ सुगंधीत तंबाखु व पानमसाला विक्री करण्यासाठी घेवुन जाणार आहे अशी माहिती मिळाली होती.  वरिष्ठाच्या सूचनेनुसार सदरची माहिती मिळताच वरील स्टाफ व पंच असे खाजगी वाहनाने रणखांब फाट्या जवळ ...

आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती

जिल्हा परिषद गट आरक्षण सोडत 1) समनापूर obc महिला... 2) आश्वी obc महिला... 3) तळेगाव महिला (सर्वसाधारण) 4) घुलेवाडी खूला  5) धांदरफळ खुला 6) बोटा St महिला  7) जोर्वे obc  8) साकुर सर्वसाधारण  9) चंदनापूरी सर्वसाधारण संगमनेर पंचायत समिती गण आरक्षण रचना २०२५/२६  1 समनापूर गट १३ निमोण गण - ना. मा. प्र.  १४ समनापूर गण - ना. मा. प्र. 2 तळेगांव गट १५ तळेगांव गण - सर्वसाधारण १६ वडगाव पान गण - अ.जा. महिला 3 आश्वी बुद्रुक गट १७ आश्वी बुद्रुक गण - सर्वसाधारण महिला  १८ आश्वी खुर्द गण - सर्वसाधारण महिला  4 जोवें गट १९ जोवें गण - सर्वसाधारण महिला  २० अंभोरे गण - सर्वसाधारण 5 घुलेवाडी गट २१ घुलेवाडी गण - अ.जा २२ गुंजाळवाडी गण - ना. मा. प्र. महिला 6 धांदरफळ बुद्रुक गट २३ राजापूर गण - सर्वसाधारण २४ धांदरफळ बुद्रुक गण - सर्वसाधारण महिला  7 चंदनापुरी गट २५ संगमनेर खुर्द गण - सर्वसाधारण महिला  २६ चंदनापुरी गण - सर्वसाधारण 8 बोटा गट २७ खंदरमाळवाडी गण - अ.ज. २८ बोटा गण - अ.ज. महिला 9 साकूर गट २९ पिंपळगाव देपा गण - सर्वसाधारण ३० साकूर गण - ना. मा. प्र. म...

बुवाजी पाटील खेमनर

Image
पठार भागातील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारा धगधगता ज्वालामुखी म्हणजे बुवाजी पाटील खेमनर   बुवाजी पाटील खेमनर यांचे 17 ऑक्टोबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते अवघे 49 वर्षाचे होते. आयुष्यभर संघर्ष करणारा हा संघर्षशाली नेता एवढ्या लवकर एक्सिट घेईल असे कुणालाही वाटले नाही. अखेर कायम अन्यायाविरोधात लढणारा हा नेता मात्र नियतीने लिहिलेल्या पानाला फाडू शकला नाही हे आमचं दुर्दैव. म्हणतात ना 'जो आवडतो सर्वाना, तोच आवडतो देवाला'. शेवटी बुवाजी पाटलांचा आणि आमचा प्रवास एवढाच होता. येथे येऊनच थांबनार होता. बुवाजी ने आपल्या आयुष्यात मोठा कार्यकर्ता संच, भक्कम मित्र परीवर बनवला होता. ज्याच्याशी मैत्री केली त्याच्या हृदयात जागा केली. म्हणून प्रत्येक मित्राच्या घरातील सदस्य बुवाजी कधी बनला कळालेच नाही. शेवटच्या क्षणी देखील त्यांनी आपले मित्र परिवारावर विश्वास ठेऊन आपल्या सोबत देखील काही मित्रानाच ठेवले. आज बुवाजी आपल्यात नाही, पण त्यांची आठवण कधीही जाणार नाही ती आमच्या हृदयात कायम तेवत राहील.. म्हणूनच आजचा बुवाजी पाटलांसाठी मांडलेला "लेख प्रपंच". आपण बघुय...

जोर्वे जिल्हा परिषद गट

Image
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे. काल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री यांनी संगमनेर मध्ये येऊन कार्यकर्त्यांना चार्ज केले. व महायुतीचा भगवा फडकवा असे आवाहन काल मंत्री विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमातून केले आहे. त्यामुळे आ अमोल खताळ यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमातून मंत्री विखे पाटील यांनी चांगलेच फटाके फोडले आहे. अजून निवडणूक जाहीर होणार आहे. नुकतेच गटनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. आणि आपण मागे तळेगाव दिघे गटाची चर्चा केली होती. आता आपण जोर्वे जिल्हा परिषद गटाची माहिती घेऊया. जोर्वे जिल्हा परिषद गटात अंभोरे गण आणि जोर्वे गण आहेत. यात जोर्वे जिल्हा परिषद गट हा इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी आरक्षित आहे तर पंचायत समिती अंभोरे गण हा सर्वसाधारण म्हणजे खुला आहे. तर जोर्वे गण हा सर्वसाधारण महिला असा असणार आहे. या गटात दोन्हीही पक्षाची कसरत पणाला लागणार आहे. या गटात दोन्हीही पक्षाची ताकद बरॊबरीत आहे. तसेच हा गट आजी माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे या गटातील राजकीय घडाम...