नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा
.jpg)
नाभिक समाजासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची स्थापना समनापूर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने राज्य सरकारकडे वंचित नाभिक(न्हावी) समाजासाठी श्री संत सेना महाराज केश कला शिल्प मंडळाची तसेच विविध मागण्यांसाठी सरकारकडे वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली होती. गुरुवार दि.9 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत सेना महाराज केश कला शिल्पी मंडळाची घोषणा करून 50 कोटी रु. तरतूद केली. महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष दत्ता शेठ अनारसे, नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ उर्फ सुधीर राऊत, दिलीप अनर्थे, विकास मदने, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम, महिला जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई जाधव, यांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. नाभिक समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने केश कला शिल्पी मंडळाला मान्यता दिली. ...