Posts

Showing posts from July 20, 2023

शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे सेंट जॉन,खडकी शाळेत 'स्कूल चले हम' व 'शाळा तेथे वाचनालय' अभियान

Image
  शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे सेंट जॉन,खडकी शाळेत 'स्कूल चले हम' व 'शाळा तेथे वाचनालय' अभियान  पुणे प्रतिनिधी  : आज 'स्कूल चले हम' या अभियान अंतर्गत सेंट जॉन शाळेतील सर्व विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप वाटप करण्यात आले. तसेच शाळा तेथे वाचनालय या अभियान अंतर्गत छ.शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, महात्मा गांधीजी तसेच क्रांतिकारी व समाजसुधारक, प्रेरणादायी पुस्तकांचा संच यावेळी देण्यात आला. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील झोपडपट्टी, डोंगराळ, दुर्गम भागात संस्थेतर्फ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळाराम माडकर हजर होते. त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अमित शिंदे यांनी संस्थेची माहिती दिली. 'स्कूल चले हम' अभियान 26 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.            मागील 20 दिवसात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्य़ात गरजू व गरीब 500 विद्यार्थीना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच 21 शाळेत 'शाळा तेथे वाचनालय' हा ...

नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने या त्रासाला वैतागून या महिलेने राहत्या घरात गळफास

Image
एकल महिला सावधान : दोन प्रियेशी असलेल्या मजनूने घेतला एका महिलेचा जीव  शेवगाव प्रतिनिधी: अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६ रोजी) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.           हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटस्फोट झालेल्या एका महिलेचे शहरातील एका व्यक्तीशी प्रेम संबंध जुळल्याने तो तिच्या घरी येत जात होता. मात्र, त्या व्यक्तीचे आणखी एका महिलेशी प्रेमसंबंध होते. आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी येता जाताना त्याने तिचे अंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केले व प्रेमसंबंध असणाऱ्या दुसऱ्या महिलेने हे व्हिडीओ तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवले. व त्याला घरी बोलावले.        परंतु घरी जाण्यास त्याने नकार दिल्याने मी तुझ्या बहिणीस...