शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे सेंट जॉन,खडकी शाळेत 'स्कूल चले हम' व 'शाळा तेथे वाचनालय' अभियान

 शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे सेंट जॉन,खडकी शाळेत 'स्कूल चले हम' व 'शाळा तेथे वाचनालय' अभियान 

पुणे प्रतिनिधी : आज 'स्कूल चले हम' या अभियान अंतर्गत सेंट जॉन शाळेतील सर्व विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप वाटप करण्यात आले. तसेच शाळा तेथे वाचनालय या अभियान अंतर्गत छ.शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, महात्मा गांधीजी तसेच क्रांतिकारी व समाजसुधारक, प्रेरणादायी पुस्तकांचा संच यावेळी देण्यात आला. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील झोपडपट्टी, डोंगराळ, दुर्गम भागात संस्थेतर्फ शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळाराम माडकर हजर होते. त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अमित शिंदे यांनी संस्थेची माहिती दिली. 'स्कूल चले हम' अभियान 26 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. 


          मागील 20 दिवसात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्य़ात गरजू व गरीब 500 विद्यार्थीना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच 21 शाळेत 'शाळा तेथे वाचनालय' हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रा.श्री.विजय नवले, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अमित शिंदे, मुख्याध्यापिका- सौ अर्चना खावडिया, शिक्षिका सौ. आढाव, सौ. बनसोडे, सौ. पातरे, सौ. थोरात, सौ. बनकर, सौ शिंदे आदी उपस्थित होते. या अभियानात खजिनदार प्रतिक कोडूलकर, सचिव योगेश पाटील, विजय मोरे, रोहित सुर्यवंशी, सारंग कुलकर्णी, नेहा शिवलकर-कुलकर्णी, डॉ.शंशाक कुलकर्णी, डॉ.नवज्योत शर्मा, नेहा चौहान, भावेश कदम, विशाल भानुसे, सचिन पाटील, ऋतुराज पाटील, विराज पाटील, प्रवीण पाटील सर्व जिल्हा प्रमूख व इतर पदाधिकारी याचा मोठा सहभाग व सहकार्य लाभत आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 



संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052



Comments

Popular posts from this blog

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच

खळबळजनक: धर्मांतरण करुन महिलेवर सामुदायिक बलात्कार...गुन्हा दाखल

काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार: राष्ट्रवादी नाराज