Posts

Showing posts from November 9, 2025

योगेश खेमनर यांची एन्ट्री

Image
साकूर गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची संख्या वाढली. योगेश किसन खेमनर जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात. यामुळे आता ही निवडणूक चौरंगी होते की काय असा सवाल उपस्थित होत आहे. जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी या निवडणुकीत उत्साह वाढत चालला आहे. तसेच अनेक उमेदवार या आखाड्यात तेल लावून व लंगोट बांधून आखाड्यात उतरत आहे. आता साकूर येथील युवा नेते योगेश खेमनर यांनी देखील या निवडणुकीत दंड थोपटले आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना युवा नेते योगेश खेमनर यांनी इच्छुक असल्याचे सांगून दंड थोपटले आहे.  योगेश खेमनर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. सध्या ते नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन आपला प्रचार करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवडणूक स्वबळावर लढावल्यास योगेश खेमनर हे साकूर जिल्हा परिषद गटातील फिक्स उमेदवार ठरले जात आहे. त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून आपल्याला उमेदवारी मिळणेबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात साकूर गटातील ही निवडणूक मोठी प्रतिषठेची ठरली जाणार...