काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार: राष्ट्रवादी नाराज

काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी: थोरातांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण झाल्याचं पत्र बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लिहिलं आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन थोड्याच दिवसांमध्ये सुरू होणार आहे, त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नव्या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. विधिमंडळ गटन...