Posts

Showing posts from October 24, 2025

आश्वी obc महिला

Image
वाचकहो, आपण सध्या संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांच्या निवडणुकीचे गटनिहाय विश्लेषण करत आहोत. आपण तळेगाव दिघे गट तदनंतर जोर्वे जिल्हा परिषद गटाचे विश्लेषण केले आहे. सध्या लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. संगमनेर तालुक्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती यांचा विचार करता दोन्हीमध्ये सरळ लढत होईल असे चित्र सध्या दिसत आहे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. आज आपण आश्वी जिल्हा परिषद गटाचे विश्लेषण करणार आहोत. आश्वी जिल्हा परिषद गट हा ओ बी सी महिला साठी आरक्षित आहे. त्यामुळे येथे अनेक महिला उमेदवार इच्छुक आहेत. तर या गटाचे दोन गण आहेत आश्वी बुद्रुक गण व आश्वी खुर्द गण हे दोन ही गण सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाले आहेत अर्थात या संपूर्ण गटात आता "महिलाराज" असणार आहे. या गटात अतिशय अटी तटीच्या लढती या अगोदर झाल्या आहेत. आश्वी गटातील गावे हे संगमनेर तालुक्यात असून विधानसभा मतदारसंघ मात्र शिर्डी आहे. त्यामुळे येथे विखे परिवाराला मानणारा मोठा कार्यकर्ता आहे. तसेच माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्...