भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे कॉंग्रेसवर शरसंधान
.jpg)
गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले..राजेंद्र गोंदकरांची जहरी टिका शिर्डी प्रतिनिधी: नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तीगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले आहेत. मात्र यातून कॉंग्रेसचे नैराश्यच उघड होत असून अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा कॉंग्रेसला जागा दाखवून देईल, असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. पंतप्रधान मोदी हे विषारी साप असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. मौत का सौदागर, खून का दलाल अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले अ...