हैवानालाही लाजवेल असे कृत्य प्रियशीला मिक्सरमध्ये दळले

कटरने केले प्रियेसीच्या धडाचे तुकडे..नंतर मिक्सरमध्ये बारीक केले हैवानाचा चेहरा/पिडीत महिला मुंबई ब्युरो रिपोर्ट मुंबईत क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडणारी हत्येची एक भयंकर घटना उजेडात आली आहे. या प्रकरणात आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरचे लाकूड कापणाऱ्या इलेक्ट्रीक करवतीने तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बुधवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी पोलिसांचे एक पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले. तिथे ते दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळालेल्या फ्लॅटवर पोहोचले. 7 व्या मजल्यावरील या फ्लॅटमध्ये पोहोचताच पोलिसांना धक्काच बसला. कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले व ऐकले होते, ते तिथे त्यांना प्रत्यक्ष पहावसाय मिळाले. रक्ताने माखलेले 3 कटर जप्त पोलिसांना फ्लॅटमधून एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारे 3 कटर आढळले. हे तिन्ही कटर रक्ताने...