काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेत आहे: राऊतांचं वक्तव्य

शरद पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट? राऊतांचं मोठं वक्तव्य म्हणाले... शरद पवारांच्या जेपीसीसंदर्भातील वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मुंबई, 8 एप्रिल: अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेताना दिसत आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याची काही गरज नाही, त्यांना जाणून-बाजून टार्गेट केलं जात असावं असं वाटतं असं पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेणार ? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवारांच्या भूमिकेत काही नवीन नाही, पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार नाही. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांनी फक्त जेपीसी संदर्भात पर्याय सांगितलल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जेपीसीचा अग्रह धरला होता असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखी...