विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच
गणेश सहकारी साखर कारखाना कोल्हेंचे नामोहरण करण्यासाठी आहे..?
संपादकीय : सहदेव जाधव
अहमदनगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा प्रचार शिगेला पोहचला असून अगस्ती कारखान्याच्या धरतीवर थोरातांनी व्यूहरचना आखलेली दिसत आहे. परंतु यात नुकसान कुणाचे हे जनतेला माहिती होणे देखील गरजेचे आहे. म्हणून हे स्पष्टीकरण गणेश परिवारासाठी मांडत आहोत. गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक ही आपापसातील सूड उगविण्यासाठी घेतली का..? हा प्रश्न प्रथम उभा राहतो.
या निवडणुकीच्या आडून थोरातांकडुन विवेक कोल्हेंना बोटाशी धरून भाजपात फुट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि हा डाव थोरातांचा यशस्वी झालेला दिसत आहे. तसेही कोल्हे राष्ट्रवादी सोडुन भाजपात गेल्या नंतर मागील विधानसभा सोडल्यास त्यांच्या पदरात हवे तसे यश पडलेले दिसत नाही. मागिल जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पराभव, विजय वहाडणे कडुन नगरपरिषदेत पराभव व त्यानंतर विधानसभेत पराभव अशी पराभवाची मालिका कोल्हेंच्या नशिबी आली आहे. पक्षात देखील विखेंच्या पक्ष प्रवेशाने नाराज झालेले कोल्हे हे पिछाडीवर गेले ते पिछाडीवरच राहिले आहे. स्वतःच्या तालुक्यात अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ कोल्हेंवर आली आहे का? कोपरगावात काळे कोल्हे असे चक्र राहिले आहे त्यात बाहेरील शक्तीचा कुठपर्यंत परिणाम होतो हे आज पर्यंत आपण अनुभवले आहे.
भारतीय जनता पार्टी कडुन पराभुत झाल्या नंतर स्नेहलता कोल्हेंना संघटनेत सचिव म्हणून घेतले होते. परंतु ह्या वेळी झालेल्या भाजपाच्या संघटनीय बांधणीतून त्यांना मानाचे स्थान भेटलेले नाही. शिवाय विवेक कोल्हे हे पण भाजपात कोठे पदावर दिसत नाही. मागिल दोन दिवसा पुर्वी भाजपाकडून जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुक प्रभारी यादीत स्नेहलता कोल्हेंना कोपरगाव विधानसभा भेटलेली आहे. परंतु विवेक कोल्हे बाळासाहेब थोरातांच्या गळाला सहकार निमित्त लागले आहे हे पण निश्चित समजावे.
कोल्हेंना भाजपात २०१४ ची मिळालेली आमदारकी सोडता मागिल ९ वर्षांत पासून स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम पराभवच पचवावा लागला आहे. कोपरगावची 'मुळ भाजपा' ही कायमच विरोधी व्यवस्थेत उभी आहे. २०१९ विधानसभेत विजय वहाडणे हे हक्काचे मतदान कोल्हे विरोधात गेल्याने स्नेहलता कोल्हे विधानसभेत पराभुत झाल्या. त्यानंतर त्यांचे खापर राधाकृष्ण विखेंवर फोडुन वहाडणेला हिन लेखण्याचे राजकारण कोल्हेंनी कोपरगावात केले. स्वतःचे संघटन सांभाळता आले नाही हे मान्य न करता समजून तर घ्यावे. व आपल्या राजकीय जीवन शैलीत सुधारणा करने गरजेचे होते. कोपरगावात काळे कोल्हे सोडुन राजकारण चालत नाही ह्याची भारत भर माहिती आहे परंतु कोल्हेंचा कमकुवत पणा हातात पकडून थोरातांनी गणेश कारखान्या निमित्त पुन्हा कोल्हेंचाच गेम केलेला दिसतो आहे. यातून विखेंना काहीही फरक पडणार नाही. परंतु विखे कुटुंबाचा सकारात्मक दृष्टीकोन समजला असता तो फक्त सभासद हिताचा होता, परंतु जिल्हाभर विखेंचे वाढत चाललेले महत्व काहींना पचनी पडत नाही म्हणून आखलेले थोरात पुरस्कृत 'गणेश द्वंद्व'
कोपरगाव कोल्हे बरोबर आज मुळ भाजपा नाही. मात्र विखे विरोधक पक्ष सोबत येतील यात शंका नाही पण आपल्या पारंपरिक स्थानिक पुढाऱ्यांचे काय..? ते सोबत येतील पण शरीराने मनाने नव्हे हे गृहीत असूद्या. गणेश कारखान्यवर आलेले हे दिवस कुणामुळे आले आहे याचे विवेचन करा आणि मंग थोरातांच्या स्मितहास्याला बळी पडा. कोपरगाव विधानसभेत राहाता तालुक्यातील गावे असतांना राहाता तालुक्यात विखेशी गणेश निवडणुकी निमित्त घेतलेलं वैर तुम्हाला धोकादायक आहे. विधानसभा परभावानंतर अनेक वेळा आपला पराभव विखें मुळे झाला असे आपण जाहीर सांगत होतात. विखे पाटील यांनी छुपी मदत समोरील उमेदवारास केली, असा आरोप आपला होता. पण आता तर तुम्ही थेट जाहीर कांॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हातात हात घेत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे विरोधात सर्व पक्षीय फौज तयार केली आहे. यामुळे आपण भाजप श्रेष्ठींकडे भविष्यात निष्ठेची तक्रार करु शकणार नाही.
भाजपा संघटन सांभाळता आले नाही. थोरातांच्या बतावणीवर विखे सोबत विनाकारण घेतलेले राजकीय वैर तुम्हाला कितपत पचनी पडेल याची शास्वती तुम्हाला आली आहे का...? याची शास्वती तुम्हाला आली असेल, तर कोल्हे साहेब आपण आजच राजकीय संन्यास घेण्याची तयारी करत आहात असे भविष्य दिसत आहे. काॅंग्रेसचे अस्तित्व सध्या नगर जिल्ह्यात तुरळक आहे. कोल्हेंनाही भाजपातील स्थानिक कार्यकर्ते सह वरीष्ठांसोबत बस्तान बसत नाही. त्यामुळे कोल्हें च्या ं हातात हात घालून कोपरगांव तालुक्यात काॅंग्रेसचे मुळं भक्कम करण्याचा थोरातांचा प्रयत्न असेल. थोरात ह्यांनी गणेश कारखाना निमित्त विवेक कोल्हेंना गळ टाकून काळेना पडद्या मागुन बळ दिले का ?
असो सध्या तरी कोल्हें हे अस्तित्वाची लढाई लढत आहेत, तर थोरात सुडापोटी विखेंची ताकद आजमावत आहे. क्रमशः
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com..
Comments
Post a Comment