विरोधक एकवटले गणेश वर विजय मिळवत शिर्डी विधानसभा काबीज करण्याची दर्पोक्ती:

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक: पराभव कुणाचा विखेंचा की कोल्हेंचा संपादकीय विश्लेषण / सहदेव जाधव गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अखेर विखे विरोधकांची महत्वाकांक्षा पूर्ण झाली. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विखेंचा पराभव म्हणजे थेट जसे काही पांडवांकडून कौरवांनी इंद्रप्रस्थ जिंकल्याचा आनंद आज विखे विरोधकांना झाला. आमदार निलेश लंके तर थेट पारनेर वरून आपली कामे सोडून शिर्डीत दाखल झाले. परंतु हा विजय नक्की कुणाचा समजावा याचे देखील विवेचन होणे गरजेचे आहे. गणेश सहकारी साखर कारखाना हि निवडणूक तशी कोल्हे आणि विखे यांच्यातील लढाई... परंतु संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे करण ससाणे, सचिन गुजर, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, दंडवते, त्याच बरोबर सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांनी कारखान्याचे हीत एका बाजूला ठेऊन फक्त विखेंचे पानिपत हा एकच अजेंडा समोर ठेवला. व याचे सर्व सूत्र हि संगमनेरच्या हाती सोपवण्यात आली. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करून घेतले व सर्व विखे विरोधकांनी आज राहात्यात दिवाळी...