भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार
.jpeg)
भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी 1200 जणांची टीम: चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी (ता. 3 मे ) दुपारी एक वाजता जाहीर होत असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्यातील नेते, प्रमुख नेतृत्व, विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास 1200 जणांची टीम होणार आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला आता साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. 12 ऑगस्ट 2022 ला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. या कार्यकारिणीच्या माध्यमातून 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा पण आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करू, त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल. • 288 विधानसभा समन्वयक 288 विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करणार. नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे ...