Posts

Showing posts from July 28, 2025

रुग्णाची किडनीच काढली

संगमनेर तालुक्यात पुन्हा एक वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर येतेय  चक्क पित्ताशयातील खडे काढायला गेलेल्या रुग्णाची किडनीच काढली.  रुगणांच्या नातेवाईकांना कुठलीही कल्पना न देता पेशंटला डिस्चार्ज... पेशंटने जीव गमावला  संगमनेर तालुक्यातील तांबे हॉस्पिटल मधील घटना..  आमदार अमोल खताळ यांच्या जनता दरबारात.. महिलेचा टाहो.. आमदार साहेब मला न्याय द्या...महिलेने टाहो फोडताच आमदार देखील भाऊक... आमदारांच्या डोळ्यातील अश्रू आमदार लपवू शकले नाही सविस्तर वृत्त असे कि,सोलापूर शहरातील भगतराम दयाराम शर्मा नामक व्यक्तीला पित्ताशयाच्या त्रास होत होता. सोलापूर येथील डॉक्टरने पित्ताशय मध्य खडे असल्याचे निदान केले. हे खडे ऑपरेशन करून काढावे लागेल, व यासाठी लाख रुपये खर्च लागेल असे सांगितले. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सदर रुग्णाच्या पत्नीने तिचे नाव मंगल भगतराम शर्मा हिने तिच्या भाच्याला म्हणजे बहिणीच्या मुलाला सर्व रुग्णाची माहिती सांगितली. तेव्हा मंगल यानाचा भाचा संजय तिरवाडी याने तांबे हॉस्पिटल येथील रेफरन्स दिला व महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार होईल असे सांगि...