बाळासाहेब भाऊसाहेब सागर
साकूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण व्यक्ती साठी आरक्षित झाला असून येथून इच्छुकांची भाऊंगर्दी वाढली आहे. साकूर गट हा तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. सध्या निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. कॉंग्रेसने साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली झेंडा फडकला आहे. त्यामुळे या गटावर कॉंग्रेसची मजबूत पकड आहे. लवकरच जिल्हा परिषदेची निवडणूकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. परंतु या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेस थेट मेडिसिन व्यावसायिक बाळासाहेब भाऊसाहेब सागर या युवकाला तिकिट दिले आहे. बाळासाहेब सागर यांचं नाव निश्चित झाले असून फक्त उमेदवाराची अधिकृत घोषणा बाकी आहे. बाळासाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित असल्याने तसा प्रचार बाळासाहेब सागर यांनी सुरू केला आहे. सोशल मीडियावर बाळासाहेब सागर यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. बाळासाहेब सागर हा तरुण राजकीय क्षेत्रात नवखा वाटत असला तरी ...