घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक
घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक एकूण ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटार सायकल, असा एकूण सुमारे ८,५०,०००/- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांची संयुक्त कारवाई मंगरूळ गावातील ता. जुन्नर जि पुणे येथील बंद घराचे कुलूप तोडून दिवसा ढवळ्या घरफोडी झाली होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा वाटे आत प्रवेश केला, आणि घरातील कपाटातून सोन्याचे दागिने एकूण साडे तीन तोळे वजनाचे एकूण १,७५,०००/- किंचे चोरी करून नेले आहेत. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद आळे फाटा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. दिवाळी सणाचे सुरूवातीस जुन्नर, खेड उपविभागात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळांची पाहणी करून सदर घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती, गुन्हे पद्धत ...