सह दुय्यम निबंधक
सह दुय्यम निबंधक संगमनेर क्र कार्यालय 2 येथे चाललेल्या भ्रष्ट कारभाराला लगाम लावा... आपण प्रसिद्ध केलेल्या बातमी नंतर त्या खरेदी खताला तहसीलदार साहेबांनी नजराणा भरण्यास सांगितले. परंतु सरकारची फसवणूक करणाऱ्या जमीन देणार घेणार यांच्यासह अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर महसूल विभागातील जांभूळवाडी शिवारात एक जमिनीचा घोटाळा समोर आला आहे. सिलिंग ऍक्ट नुसार या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे कायाद्यात तरतूद आहे. परंतु हा कायदा धाब्यावर बसून खरेदी घेणार व देणार यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. तसेच संबंधित जमिनीच्या मालकाने याबाबत आणखी काही व्यवहार केले आहेत. परंतु हे व्यवहार सिलिंग ऍक्ट चा भंग म्हणून हे व्यवहार पूर्ण झाले नाहीत. परंतु आता खरेदीखत करणारे जमीन देणार आणि घेणार यांनी सह दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून शासनाची फसवणूक करत लाखो रुपयांचा महसूल बुडावला आहे. याच अनुषंगाने आता तहसीलदार धीरज मांजरे यांनी आपल्या बातमीची दखल घेऊन सदर खरेदीखत वैध ठरवण्यासाठी नजराणा भरण्या...