बांधकाम कामगार लोचा
साकूर पठार भागासह बोटा घारगाव येथे बांधकाम कामगार योजनेचा टाळूवरचे लोणी खाणाऱ्या दलालांवर कारवाई करणार का...? घारगाव भागातील दलाला नंतर आता साकूर येथे देखील बोगस कामगारांना आर्थिक लालसेचा किरण दाखवणाऱ्या दलालाची चर्चा जोमात सुरु... प्रशासनाला राजसत्ता न्यूज च्या माध्यमातून खडा सवाल..? कारवाई करणार का..? बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच आर्थिक सुविधा पुरविल्या जातात व अनेक योजनांचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी 84 प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात मात्र याचाच फायदा उचलत काही दलालांनी आपली चूल मांडली आहे. साकूर, घारगाव परिसरात हे प्रकरणे उघड होत आहे. आम्ही व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही. पण यातून फार मोठे रॅकेट समोर आले आहे. संगमनेर चे आमदार अमोल खताळ यांनी अशा दलालांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले आहे. पण यावर कामगार कल्याण मंडळाने चौकशी लावून संबंधित दलालांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या बांधकाम कामगार नोंदणीमध्...