भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे कॉंग्रेसवर शरसंधान
गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले..राजेंद्र गोंदकरांची जहरी टिका
पंतप्रधान मोदी हे विषारी साप असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. मौत का सौदागर, खून का दलाल अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले असून अशाच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना खासदारकीदेखील गमवावी लागली आहे. त्यामुळे आता गांधी परिवाराची भाषा त्यांचे निष्ठावंत हुजरे बोलू लागले आहेत, अशी टीका राजेंद्र गोंदकर … यांनी केली.
देशाच्या पंतप्रधानांविषयी अशी बेताल वक्तव्ये करून अगोदरच धुळीस मिळालेली पक्षाची प्रतिमा रसातळाला नेत असल्याचे भान कॉंग्रेसी पोपटांना नाही, पण जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा देतानाच, या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही राजेंद्र गोंदकर… यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com..
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment