नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने या त्रासाला वैतागून या महिलेने राहत्या घरात गळफास

एकल महिला सावधान : दोन प्रियेशी असलेल्या मजनूने घेतला एका महिलेचा जीव 


शेवगाव प्रतिनिधी: अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६ रोजी) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

          हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटस्फोट झालेल्या एका महिलेचे शहरातील एका व्यक्तीशी प्रेम संबंध जुळल्याने तो तिच्या घरी येत जात होता. मात्र, त्या व्यक्तीचे आणखी एका महिलेशी प्रेमसंबंध होते. आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी येता जाताना त्याने तिचे अंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केले व प्रेमसंबंध असणाऱ्या दुसऱ्या महिलेने हे व्हिडीओ तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवले. व त्याला घरी बोलावले. 

      परंतु घरी जाण्यास त्याने नकार दिल्याने मी तुझ्या बहिणीस बदनाम करील, तिचे जगणे मुश्किल करील व हे व्हिडिओ सर्वांना दाखवील, अशी धमकी दिली. त्यानंतर भावाने बहिणीला याची विचारणा केली असता, मी घरात अंघोळ करत असताना व्हिडीओ काढल्याची माहिती दिली. याची माहिती पीडितेच्या मुलीला समजल्याने तिने रागाच्या भरात फिनेल घेतले होते. नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने या त्रासाला वैतागून या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052




Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच