रहीमपूरच्या सोसायटीचे तालुक्यातून होत आहे कौतुकाचा वर्षाव

रहीमपूर सोसायटीनी सभासदांची दिपावली केली गोड.  

संगमनेर तालुक्यातील विशेष दर्जा असलेली सोसायटी

 संगमनेर प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यातील रहिमपूर गावची 'रहीमपूर विविध विकास कार्यकारी सोसायटी' ने दिली सभासदांना दिपावलीत नव संजिवनी. 

     सविस्तर वृत्त असे की, रहीमपूर सोसायटीची दिपावलीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली यांत सभासदांना ५% डेव्हिडंट देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन, यांनी सांगितले. 

    यावेळी सोसायटीच्या सभासदांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब एकनाथ शिंदे, व्हा.चेअरमन राजेंद्र आबाजी गाढे पाटील, सेक्रेटरी विलास कोल्हे, सचिव बाळासाहेब गीते यांचे आभार मानले आहे. रहिमपूर सोसायटीचे काम याआधीही नाविन्यपूर्ण होते. सभासदांचे हीत जोपासणे हे एकमेव धोरण लक्षात घेऊन संचालक मंडळ काम करत आहे. त्यामुळे या सोसायटी ची चर्चा तालुक्यात कौतुकाने केली जाते. यावेळी संचालक गणपत बाळासाहेब शिंदे, सिताराम शिंदे, भिमाजी वाळुंज, आप्पासाहेब गुळवे, भाऊराव चंद्रभान शिंदे, बाळासाहेब शिंदे, द्वारकानाथ गुळवे, रूपदास बैरागी, एकनाथ माळी, हिराबाई गुळवे, सुरेखा शिंदे आदी संचालक उपस्थित होते.

 राजयोग मानस वृत्त

 संपादकः सहदेव जाधव

  95 45 52 90 52

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच