अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार: विजय शिवतारे
सुळे-सत्तार वाद: 'पहाटेच्या शपथविधीला किती खोके मिळाले..? शिंदे आक्रमक
मुंबई, 8 ऑक्टोबर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केलं. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तर पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली.
अब्दुल सत्तार यांच्या या वादानंतरल एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेनाही आक्रमक झाली आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिला आहे.'अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे, पण हे का झालं? प्रत्येक आमदार 40-50 लाख लोकांमधून निवडून येतात. मग किती दिवस संयम ठेवणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी सत्तार यांना समज दिला. आम्ही पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो,' असं विजय शिवतारे म्हणाले.
'सुप्रिया सुळे यांच्याकडे काय पुरावे आहेत, हे त्यांनी सांगावं. अजित पवार जेव्हा पहाटे शपथविधीला गेले तेव्हा किती खोके त्यांना मिळाले होते, हे त्यांनी सांगावं. 4 महिने जनतेच्या समस्या बाजूला ठेवून जे राजकारण होत आहे, त्या ऍक्शनला ती रिएक्शन होती. सत्तार यांची जीभ घसरली तर एवढा उहापोह का?,' असा सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.
'50 खोके आणि बोके असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना डिफमेशनची केस पाठवली जाईल, तयार राहा, उद्या प्रक्रिया सुरू होईल,' असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी खेद व्यक्त केला आहे. हे फक्त सुप्रिया सुळेंना उत्तर होतं, समस्त महिलांना नाही, सत्तार यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.
राजसत्ता मिडिया ग्रुप शी संपर्क साधा
संपादक: सहदेव जाधव 9545529052
कार्य.संपादक: नवनाथ वावरे
सह संपादक: सतिश फापाळे
Comments
Post a Comment