नराधमाने हद पार केली मुलींनो सावधान

श्रद्धा वालकर मर्डर प्रकरणावर अनेक जण आपलं मत मांडत आहे. अभिनेत्री केतकी चितळेनंतर अभिनेत्री आणि गायिकेनं तिचं मत मांडलं आहे.पाहा तिची पोस्ट




 मुंबई, 16 नोव्हेंबर : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकरहत्या प्रकरणानंतर देश चांगलाच हादरून गेला आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेल्या श्रद्धाची बॉयफ्रेंड आफताबनं गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर नराधमानं श्रद्धाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दोघांमध्ये किरकोळ वाद झाले आणि त्या वादातून आफताबनं श्रद्धाची निर्घूण हत्या केली. आफताब पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटी देखील यावर आपलं मत मांडत आहे. काल अभिनेत्री केतकी चितळेनं याविषयी पोस्ट शेअर केली आहे. तर आज अभिनेत्री आणि गायिता केतकी माटेगावकर हिनं पोस्ट शेअर करत मुलींना प्रेमाचा सल्ला दिला आहे. सध्या केतकीची पोस्ट चर्चेत आहे.

केतकीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिल्ली हत्याप्रकरणावर भाष्य केलं आहे. केतकीनं म्हटलंय, 'एक सुंदर जग आपले आई वडिल आपल्याला देतात. सुख सोयींनी आणि उत्तम सुरक्षित असं. आपण हे सगळं बघू शकतो कारण जगातील वाईट गोष्टी आपले पालक आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. पण एक चुकीचा निर्णय मात्र आपलं आयुष्य बदलू शकतो.  श्रद्धा, एक सुंदर तरूणी तीच काय चुकलं? ती फक्त प्रेमात पडली पण ती चुकीच्या व्यक्तीच्या. काल ही बातमी पाहून माझी झोप उडाली'.

केतकीनं सगळ्या मुलींना उद्देशून पुढे म्हटलंय, 'सगळ्या मुलींना माझ्या मैत्रिणींना प्रेमाचा सल्ला आहे. कोणावरीही विश्वास ठेवू नका अगदी कोणावरही. स्वत:चं भविष्य सुंदर करण्याची ताकद तुमच्यात आहे. हो तुमच्या एकटीत आहे. ती शक्ती कोणालाही पूर्णपणे देऊ नका. जग जस आहे तसं त्याच्याकडे पाहा. तुम्हाला जग जस वाटत तसं ते नाहीये. त्यामुळे कोणाला फसू नका, मुर्ख बनू नका. आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे कोणावरही विश्वास ठेवू नका'.

केतकीनं मनातील भावना मांडत शेवटी लिहिलंय, 'श्रद्धाच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्या नराधमाला कडक शिक्षा मिळो हिच मनापासून प्रार्थना आणि इच्छा आहे. आणि असं कृत्य पुन्ह होणार नाही असं वचन देऊया'. केतकीच्या पोस्टला सध्या अनेकांनी समर्थन दिलं आहे.

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली आहे. हत्या करण्यापूर्वी त्यानं अशाप्रकरची अमेरिकन वेब सीरिज आणि सिनेमे पाहिले होते असं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे आरोपीनं घरातील रक्ताचे डाग काढण्यासाठी विशिष्ट प्रकारच औषध खरेदी केलं होतं. तसंच हत्या केल्यानंतर आरोपीनं श्रद्धाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. मागच्या तीन आठवड्यांपासून तो तुकडे जंगलात नेऊन फेकत होता.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी RAJSATTA NEWS वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज RAJSATTA NEWS PORTAL. 

संपादक: सहदेव जाधव मो. ९५४५५२९०५२



Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच