गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे अपघातात जागीच ठार

 संगमनेर तालुक्यात मोठी हळहळ: अंमळनेर येथील बीडीओ जागीच ठार



संगमनेर (राजसत्ता न्युज): संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी कार्यरत असलेले बिडिओ एकनाथ चौधरी हे सध्या यावल तालुक्यात कार्यरत होते. अमळनेर येथे झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे ठार झाले आहेत. तर चालक जखमी झाला आहेत. चौधरी हे चालकासह नाशिक येथे शासकीय कामांसाठी चालले होते. यावल येथून निघाल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे.

एकनाथ चौधरी हे एक कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांनी याआधी संगमनेर पंचायत समितीत अतिशय समाधान कारक काम केले. लोकप्रतिनिधी व प्रशासक यांच्यातील समतोल राखण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. अशी माहिती पंचायत समितीचे सदस्य किरण मिंडे यांनी दिली. यावेळी त्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच एक सुसंस्कृत व कर्तव्यनिष्ठ अधिकारी गेल्याने प्रशासनाची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार मिंडे यांनी काढले आहेत.

 ‌‌‌‌.              किरण मिंडे(पंचायत समिती सदस्य, संगमनेर)  



सविस्तर वृत्त असे की, आज दिं 23 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी चौधरी हे चालकासह यावल येथून नाशिककडे शासकीय वाहन क्रमांक एम.एच.19 डी.व्ही.4199 ने कामासाठी नाशिक येथे जात होते. अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाचा भिषण अपघात झाला. त्यात चौधरी हे जागीच ठार झाले तर गाडीवरील चालकाला किरकोळ दुखापत झाली. 

भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याची प्राथमिक माहिती आहे. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार होता शिवाय यावल पंचायत समितीचा प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या अगोदर संगमनेर पंचायत समितीतही सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच