धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे बेताल वक्तव्य

अजित पवार यांच्या त्या वक्तव्या बद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन 



  महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्या बाबत महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे बेताल वक्तव्य करून सबंध हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री व अत्ताचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनि धर्मासाठी दिलेले बलिदान विसरले आहेत. ज्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला, धर्म बदला म्हणून ४० दिवस अतोनात त्रास दिला, शरीराचे एक एक अवयव काढून क्रूर अशी हत्या करण्यात आली. तरी देखील त्यांनी धर्म बदला नाही असे एकवचनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. तरीही जाणीवपूर्वक त्यांची हेटाळना करण्याच्या उद्देशाने विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलेले बेताल वक्तव्य हे हिंदू धर्मियांचे मन दुखावणारे आहे. 

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा वतीने अजित पवार यांनी केलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर बेताल वक्तव्याचा आम्ही निषेद करत आहोत. तरी अजित पवार यांनी सर्व संभू भक्तांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच वतीने देण्यात आला आहे. 



       महिला मोर्चाच वतीने निषेध आंदोलनाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मनीषा फुलारी, स्मिता काळे, सुरेखा काळे, लताबाई सोनवणे, सुरेखा काळे, गीता पारखे, पुजा पारखे डॉ.निर्मला सांगळे,.मनीषा पतंगे, डॉ.विद्या कोलते तसेच बाळासाहेबांची शिवसेना ता.अध्यक्ष मीराताई गुंजाळ, माधुरी मावस्कर, सुनीता गायकवाड, निता वाघ, जयश्री कराळे, धनश्री वाघ, त्रिवेणी वालतुरे आदी महिला उपस्थित होत्या.



 बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा

संपादक: सहदेव जाधव

9545529052                                       

                                                  

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच