शिवसेना व धनुष्यबाण गेल्यावर उद्धव ठाकरे चा मातोश्रीबाहेर शिंदे व भाजप वर टीकास्र
उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना व धनुष्यबाण गेल्याने ठाकरे उद्विग्न
यात धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे ना मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे तर ठाकरे समर्थकांत मात्र मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येत आलिशान गाडीतून समर्थकांना संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान मोदींवर देखील सडकून टिका केली.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं गेलंय, पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय. गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही,असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं गेलंय, पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय. गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचं नाही,असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पंतप्रधानांना असं वाटत असेल ज्या काही त्यांच्या गुलाम बनलेल्या यंत्रणा आहेत त्या अंगावर सोडून शिवसेना संपवता येत असेल तर असं होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरं या असं आव्हान देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
मोदींना टोला
दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टोला लगावला आहे. मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लगतंय हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत. मी पुन्हा एकदा आव्हान देतो धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरं या असं आव्हान त्यांनी यावेळी शिंदे गटाल आणि भाजपला दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W)
संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment