संगमनेर येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक दिन समारंभ संगमनेर येथे साजरा


संगमनेर प्रतिनिधी: आज दिनांक १५/०३/२०२३ रोजी श्रीमती जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर, किशोर कदम सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांचे अध्यक्षतेखाली संगमनेर तहसिल कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       याप्रसंगी अमोल निकम, तहसीलदार संगमनेर, शीतल घावटे, परिविक्षाधीन तहसीलदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुरेश राहणे, दिनेश थोरात, संगमनेर तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर, सर्जेराव वाघ, सचिन गिरी, सौरभ म्हाळस ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका सचिव, कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार गोडसे सर, तसेच वजनमापे निरीक्षक फटांगरे, व संगमनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक व नागरिक उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम तहसीलदार संगमनेर यांनी केले.


         या प्रसंगी किशोर कदम, सुरेश राहणे सर, विनायक वाडेकर,  फटांगरे साहेब, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी उपस्थिताना ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर राक्षे यांनी ग्राहकांनी त्यांच्या हक्काबाबत जागरूक रहाणेबाबत मार्गदर्शन केले. 
      उपस्थित ग्राहकांनी गॅस एजन्सी, महावितरण, गावपातळीवर ग्रामपंचायत मध्ये नागरिकांची सनद असणे आवश्यक आहे तसेच मॉल, मिठाई केंद्र, फळविक्रेते आदी. बाबत आपल्या वेगवेगळ्या तक्रारी मांडल्या त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकाचे निरसन केले व चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी केले. आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता

न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच