माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपलब्ध केला नेवाशासाठी मोठा निधी
नेवासा नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी दोन कोटी निधी मंजूर.
नेवासा प्रतिनिधी: (सलमान शेख) नेवासा शहरामध्ये नवीन व्यापारी संकुल उभे करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार माजी आमदार मुरकुटे यांच्याकडे करण्यात येत होती. नेवासा एक तीर्थक्षेत्र आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग नेवासा तालुक्यातून जात असल्याने नेवास्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तृत होत आहे. या विस्तारीकरणामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी जागेची तसेच संकुलाची आवश्यकता होती. व्यापारी संकुल नसल्याने व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. या अडचणी व्यापाऱ्यांनी वेळोवेळी माजी आमदार मुरकुटे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा येथे नवीन व्यापारी संकुलाची मागणी केली 2018 मध्ये केली होती.
नेवाशामध्ये 110 गाळे व्यापारी संकुला करिता सव्वातीन कोटी रु.निधी मंजूर केला होता यापैकी 44 गाळ्यांचेच काम पूर्ण झाले. उर्वरित निधी सत्ता बदल झाल्या नंतर इतर ठिकाणी वापरण्यात आला..असा आरोप काही व्यापारी वर्ग करत होता. त्यामुळे हे व्यापारी संकुल अपुरे पडत असल्याने आज माजी आमदार मुरकुटे यांनी यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून नेवासा येथील व्यापारी संकुल साठी दोन कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे बाजारपेठेचे वैभव वाढणार असून व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी जागा व गाळे उपलब्ध होणार आहे.
तसेच व्यापाऱ्यांच्या जागेचा प्रश्न सुटणार आहे या संकुलामुळे नेवाशाच्या वैभवात भर पडणार आहे व्यवसायासाठी जागा उपलब्ध होणार असल्याने नेवासा शहरातील व्यापारी तसेच जनतेच्या वतीने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे आभार व्यक्त केलेे जात आहे तसेच हा निधी तालुक्याकरता उपलब्ध करून दिल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment