अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर १५९ अर्ज दाखल
आजी माजी आमदार डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड यांच्यात पुन्हा एकदा चुरस
अकोले प्रतिनिधी: अकोले बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. अकोले बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात आजी माजी आमदार यांच्यात पुन्हा एकदा चुरस अनुभवायला मिळणार आहे. डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड या आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाल्याने शेतकरीसुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. अकोले बाजार समिती निवडणुकीत अखेरच्या दिवशी सोमवारी तब्बल १५९ अर्ज दाखल झाले.
या निवडणुकीतून १८ सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत मतदारांची संख्या ही २ हजार ४७० एवढी आहे. निवडणुकीसाठी ३ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. या निवडणुकीसाठी एकूण १५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. ३० एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. सहकारी संस्था सोसायटी मतदार संघातील ११ जागासाठी ९३, हमाल मापारी संघातुन १ जागेसाठी ४, ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागासाठी ४८, व्यापारी मतदारसंघातून २ साठी १४ असे एकुण १५९ अर्ज दाखल झाले आहेत.
हे आहेत इच्छुक उमेदवार :
बाजार समिती निवडणूकीत संचालक पदासाठी रवींद्र गोर्डे, अर्जुन गांवडे, गणेश पापळ, महिपाल देशमुख, राजेंद्र देशमुख, रविंद्र मालुंजकर, सुदाम नवले, भानुदास तिकाडे, संदेश वाळूज, शांताराम संगारे, अशोक उगले, विकास बंगाळ, चक्रधर संदगिर, बाळासाहेब सांवत, भानुदास गायकर, मधुकर दराडे, गंगाराम भोर, चंद्रमोहन निरगुडे, रोहिदास भोर, जालिंदर बोडखे, अशोक आवारी, वसंत धुमाळ, विलास शेवाळे, शिवाजी वाल्हेकर, अनिल सांवत, रावसाहेब वाळुज, भाऊसाहेब बाराहाते, राजेंद्र गवांदे, ईश्वर वाकचौरे, बाळासाहेब आवारी, नामदेव आंबरे, दशरथ ठोंगिरे, किरण कानकाटे, गोरख वालझाडे, अंकुश मुतडक या मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com..
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment