आ.बाळासाहेब थोरात गटाच्या विजयाने तालुक्यात उत्साहाचे वातावरण

शिबलापूर व पिंपळगाव देपा ग्रामपंचायत पोट निवडणुकीत थोरात गटाचा विजय


प्रतिनिधी: महेश खुळे 

 संगमनेर प्रतिनिधी: विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायती कार्यरत असून काही ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व जागांवर आमदार थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळवला असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आमदार थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली, नांदुरी दुमाला या गावांमधील पाच जागांकरिता शुक्रवारी पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये आश्वी गटातील शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आमदार थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे व करुणा सागर मुन्तोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पिंपळगाव देपामधून नाना बाळशीराम गांजवे, पोखरी हवेलीमधून संचिता दिनकर घुले व नांदुरी दुमाला येथून वैशाली अमोल कराळे हे विजयी झाले आहेत.

हे सर्व उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात गटाचे आहेत. या सर्व उमेदवारांचे यशोधन जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मिलिंद कानवडे, किरण मिंडे, मारुती कवडे आदींसह विविध पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे म्हणाले, संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून आमदार थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे ही तालुक्याची ताकद असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन केले.

यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबादच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला थोरात जिंदाबादच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. पोटनिवडणूक झालेल्या गावात गुलाल आणि फटाक्यांच्या आतषबाजी करत सर्व उमेदवारांनी आपला विजय साजरा करण्यात आला.

संगमनेर तालुका काँग्रेसचा बालेकिल्लाच समजावा का ?

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून कार्यकर्त्यांची मोठी फळी आपल्या तालुक्यात आहे. निवडणूक ही लोकशाहीमधील प्रक्रिया असून निवडणुकीनंतर सर्वांनी आपसातील मतभेद दूर करून गावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यापुढेही तालुक्यातील गावांच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही अश्वासन त्यांनी दिले.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052



Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच