शेवगाव दंगलीतील मास्टर माईंड शोधून काढणार:ना.विखे पाटील

शेवगाव येथील दंगल प्रकरणी विखे पाटील अलर्ट मोडवर...शहराची पाहणी 



शेवगाव प्रतिनिधी: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत राडा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच तीन पोलिस व गृहरक्षक दलाचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले, तरी शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, २९ जणांना अटक केली आहे.

       दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १५) तालुक्यात ठिकठिकाणी कडकडीत ‘बंद' पाळण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहरात फिरुन आढावा घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, अजित पाटील हे शेवगाव शहरात तळ ठोकून होते. याप्रकरणी पोलिस कर्मचारी महेश सावंत यांनी फिर्याद दिली.

           पोलिसांनी १०० ते १५० अनोळखींविरुद्ध गुन्हे दाखल केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ११२ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी ३२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने, त्यांना सोडुन देण्यात आले. या घटनेत पोकॉ महेश लक्ष्मण सावंत, पांडुरंग वीर, रामेश्वर वसंत घुगे, होमगार्ड गणेश नवनाथ कराळे, सतीश विष्णू तांदळे, मयुर विश्वासराव म्हस्के, आरीफ बहादूरखान पठाण हे पोलिस कर्मचारी जखमी झाले.

       अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे : इमरान दिलावर पठाण, इसान मुस्तफा पठाण, बंडू मधुकर वाबळे, राहुल नवनाथ कुसळकर, मुस्तफा मन्सुर खान पठाण, इस्तीयाज ईस्माईल शेख, नईम इलीयास सय्यद, अमर मुस्तफा शेख, सल्लाउद्दीन हशमोद्दीन शेख, रिजवान आयुब शेख, वसिम अल्ताफ शेख, सोमनाथ सतीश मोहिते, यासीर इस्माईल शेख, मतीन युसुफ शेख, शब्बीर यूसुफ जहागिरदार, जावेद चाँद शेख, अर्शद अहमद शेख, बापूसाहेब चंद्रकांत वाघ, बाबासाहेब दादू वाघमारे, प्यारेलाल दस्तगीर शेख, सलीम फैय्याज शेख, फिरदोस फारूक पठाण, शमशोटीन कदीर सय्यद, नदीन जाफर शेख, रज्जाक कदीर सय्यद, हुसेन रहीम बेग, रोहित अशोक सुमारे, कैलास भाऊराव तिजोरे, अरिज नजीर पठाण.

मास्टर माईंडचा शोध घेणार

समाजकंटकाच्या दहशतीला न घाबरता, व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करावीत. शेवगावच्या इतिहासात झाली नसेल, अशी कठोर कारवाई दंगलीत सहभागी असणाऱ्या, तसेच गुंडावर करण्यात येईल. त्यांच्यामागे कोण मास्टरमाइंड आहे, याचा शोध घेणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

पोलिस बंदोबस्तामुळे शेवगाव शहराला छावणीचे स्वरूप

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहराला भेट दिली. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर  पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह तीन आरसीबी, तीन एसआरपी तुकड्या, १२ पोलिस निरीक्षक, २० सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह २०० पोलिसांचा बंदोबस्त प्रमुख ठिकाणी तैनात केला आहे. सीसीटीव्ही व व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहून पोलिस आरोपींची खातजमा करीत आहेत.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 

संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052


Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच