आषाढी एकादशी निमित्त अंभोरे मुस्लीम तरुणांचा अनोखा निर्णय

 संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम 


संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील मुस्लिम बांधवानी एकत्र येत हिंदू मुस्लिम जातीय सलोखा राखण्यासाठी बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेस ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद असल्याने हा निर्णय अंभोरे येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. 

अंभोरे येथे मुस्लिम समाज यांनी बकरी ईद च्या दिवशी एकादशी असल्याने कुर्बानी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गावातील चिकन मटण शॉप देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अंभोरे गावात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी काही मुस्लिम तरुणांनी हा निर्णय ग्रामस्थांना कळवला असता त्यास सर्व मुस्लिम बांधवानी त्यास उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. यावेळी अंभोरे गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी गावातील शोएब मणियार, आरिफ मणियार, खलील मणियार, समीर मणियार, इम्रान मणियार, मन्सूर मणियार यांनी पुढाकार घेतला आहे. 

जोर्वे गावातील तरुणांना हकनाक मारहाण झाल्याने सध्या संगमनेर तालुक्यात हिंदू मुस्लिम जातीय तेढ निर्माण झाली होती. त्याचबरोबर शहरातील वाढते कत्तलखाने यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत अश्यातच या अंभोरे गावातील मुस्लिम बांधवानी हिंदू मुस्लिम भाईचारा राखण्याचा प्रयत्न केला आहे. याचे सर्व हिंदू बांधवानी स्वागत केले आहे. 


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 


संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052


Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच