अकोले तालुक्याचा आमदार होण्यासाठी अनेकांना आतापासूनच डोहाळे
अकोले तालुक्याचा कोण होणार जननायक..? पिचड, लहामटे, भांगरें,
संपादकीय : सहदेव भिकाजी जाधव
राज्याच्या राजकारणात मोठे अवडंबर सुरु असून राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षात कार्यकर्ते मोठे सैरभैर झालेले दिसून येत आहे. नुकतेच अजित दादा पवार यांनी मोठे बंड केलेले सर्व देशाने बघितले. यात एकटे अजितदादांनी बंड केलेले नसून सर्वच जेष्ठ नेत्यांनी यावेळी बाहेर पडत शरद पवार यांना मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात दुफळी निर्माण झाली आहे. आता हीच परिस्थिती अकोले तालुक्यात देखील झाली आहे. आमदारांसह तालुक्याचे प्रमुख नेत्यांची मोठी पंचायत झालेली बघायाला मिळत आहे.
अकोले तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलाढाल सुरु असून अनेकांनी यात आपली पोळी भाजेल का याचा अभ्यास सुरु केला आहे, अकोले तालुका तसा पुरोगामी तालुका म्हणून संबोधला जातो. जातीयवादी पक्ष्याला कधीही या तालुक्याने स्वीकारले नाही. आजपर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असाच या तालुक्याची ओळख राहिलेली आहे. हि ओळख तत्कालीन राष्ट्रवादी नेते मधुकर पिचड यांनी या तालुक्याला करून दिली. मागील पंचवार्षिकला म्हणजे २०१९ च्या विधानसभेत हे चित्र पालटेल असे भासत होते परंतु अकोल्याच्या जनतेला पिचड यांनी भाजपवासी झाल्याचे भावले नाही. आणि २०१९ ला किरण लहामटे हे अकोले तालुक्याचे आमदार झाले. २०१९ ला पवार कुटुंबीयांनी अकोले तालुक्यात संपूर्ण ताकद लावून सर्व पिचड विरोधक व समर्थक फोडण्यात यश मिळवले. आणि पिचड याना शह दिला व त्यात ते यशस्वी झाले आहेत.
आता मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडली असल्याने अकोले तालुक्यात देखील राष्ट्रवादीचा एक मोठा गट पवार साहेबांसोबत असल्याने भावी आमदार या तालुक्याचा कोण होईल याची शंकाच आहे. आमदार किरण लहामटे यांची निर्णय घेताना उडालेली त्रेधा त्रिपट आपण सर्वानी पहिली आहे. हे अकोलेकरांना भावलेले दिसत नाही.. अकोले तालुक्यात आता मात्र सर्वच छोट्या मोठ्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी २०२४ च्या विधानसभेसाठी कंबर कसलेली दिसत आहे. राष्ट्रवादीच्या अजितदादांनी थेट भाजप बरोबर हात मिळवणी केल्याने हा मतदार संघ उद्या कुणासाठी सोडला जाईल हे देखील विवेचन होणे गरजेचे आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर वैभव पिचड हेच भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार राहतील अशी दाट श्यक्यता दिसत आहे. इकडे मात्र भांगरे गट पुन्हा एकाकी पडणार असून एकाकी झुंज देण्याची वेळ भांगरेवर येऊ शकते. भांगरे हे भविष्यात कोणत्या गटातून लढतील हे जर अंदाज सांगता येणार नसला तरी ते उमेदवारी करणार व त्यासाठी त्यांना शरद पवार यांचा आशीर्वाद राहणार हे पण नक्की. अशोक भांगरे याना मानणारा मोठा गट अकोले तालुक्यात आहे. त्यांच्या मृत्यू नंतर सुनिताताई भांगरे यानी जनतेत जाऊन मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे याच पक्षाचे मते विभागली जाणार असून भविष्यात वैभवराव पिचड यांना पुन्हा संधी मिळू शकते. यासाठी मात्र त्यांना जनसंपर्क वाढवावा लागेल. अकोले तालुका भौगोलिक दृष्ट्या अडचणींचा तालुका आहे, त्यामुळे पायाला भिंगरी बांधून मतदार संघात फिरला तर पिचड अकोलेतून कमळ फुलवू शकतात. पण पुढील काळात सुनिताताई भांगरे यांचे कडवे आव्हान पिचडांसमोर उभे राहणार हे पण निश्चित...!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com..
संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052
Comments
Post a Comment