राहुरी तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार धसाळ

पत्रकार विनीत धसाळ यांची संजय गांधी निराधार योजना समिती च्या अध्यक्ष पदी निवड. 

शेख युनूस अ. नगर/ राहूरी तालुक्यातील निर्भीड, पत्रकारितेतील धारदार लेखणीतून अन्यायला वाचा फोडणारे तांदूळवाडी येथील आणि राहूरी तालुका पत्रकार विनीत आनंदराव धसाळ यांची राहूरी तालुका येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

    सविस्तर माहिती अशी की, राज्याचे महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशी नुसार व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री पै.शिवाजीराव कर्डीले आणि खासदार. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विनंती नुसार जिल्हाधिकारी  सिद्धराम सालीमठ यांनी राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची निवड केली आहे. 


पत्रकार विनीत धसाळ यांची राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या (सामाजिक क्षेत्र )अध्यक्ष म्हणून तर सदस्यपदी किरण ससाणे(अनु. जाती ), वैशाली उत्तम खुळे (महिला ), अविनाश बाचकर (विमुक्त जाती /भटक्या जमाती), अजित डावखर (सर्व साधारण ), सर्जेराव घाडगे (अपंग ), गोरख अडसूरे (स्व. संस्था प्रतिनिधी ), संदीप आढाव (सामाजिक कार्यकर्ते), नारायण धनवट (जेष्ठ नागरिक ), दीपक वाबळे (इतर मागास प्रवर्ग ),

     तर गटविकास अधिकारी, पंचायत समिती राहूरी (शासकीय सदस्य ), तहसीलदार राहूरी सदस्य सचिव अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com.. 



संपादक : सहदेव भिकाजी जाधव (B.A.D.L.L & L.W) संपर्क: rajyogmanas770@gmail.com/ 9545529052


Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच