भालचंद्र नेमाडे यांनी ओकलेली गरळ पण बोलवते धनी कोण

भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य म्हणजे गाढवाने कथन केलेली कथा 

संपादक: सहदेव जाधव 

दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांची जीभ घसरली. ही जीभ घसरली आणि अखंड हिंदुस्थान चा अवमान झाला. आता त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब, पेशवे यांच्या संदर्भात नेमाडे यांनी ही वक्तव्य केली. औरंगजेबाला सर्वोच्च दर्जा देताना आपली 'साठी बुद्धी नाटी' झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी नेमाडे यांनी देऊन टाकले. या माध्यमातून त्यांनी इतिहासाची पाने चुरगळून बीनअकलेचे तारे मोजले. 


       ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरुन हा मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे यांनी सोमवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यानी केलेल्या काही वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.



       आशुतोष दुबे यांनी भालचंद्र नेमाडे याच्यावर हिंदू ब्राह्मणांच्या भावना दुखावण, लोकांना चिथावणी देणं आणि सार्वजनिक सदभावना बिघडवल्याचा आरोप केला आहे. भारतीय दंड विधान संहितेच्या कलमातंर्गत योग्य ती कारवाई करण्याची विनंती त्यांनी मुंबई पोलिसांना केली आहे. भालचंद्र नेमाडे यांनी जाहीर कार्यक्रमात औरंगजेब, ब्राह्मण आणि पेशव्यांवर उघडपणे वक्तव्य केली. दुसऱ्या बाजीरावाने महाराष्ट्र इंग्रजांच्या हातात सोपवला, असे नेमाडे म्हणाले.औरंगजेबाला दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशीला गेल्या होत्या, त्यावेळी हिंदू पंडितांनी त्यांचं अपहरण करून त्यांना भ्रष्ट केलं. म्हणून औरंगजेबाने मंदिर फोडली, अशी वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केली होती. भाजपा नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला व आता तक्रार नोंदवली आहे. भाल चंद्र नेमाडे यावर कायदेशीर कारवाई करुन अशा वाचाळवीराला वेळीच व्यसन घालणं गरजेचं आहे. 


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी राजसत्ता न्यूजवर.. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट www.rajsattanews.com


संपादक: सहदेव जाधव

(बी ए डी एल एल अँड एल डब्ल्यू)

संपर्क : rajyogmanas770 @gmail.com







Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच