राहत्यात गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायाद्याचे सर्रास उल्लंघन 

राहाता शहरात तसेच ग्रामीण भागातील एका गावात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायाद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. राहाता शहरात नगर मनमाड हाय वे वर हे सेन्टर खुलेआम सुरु आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचा या सेंटर ला अर्थपूर्ण सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोग्य विभाग या सोनोग्राफी सेंटर कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर येतंय. आम्ही या सर्व सोनोग्राफी सेंटर सह गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल चे स्टिंग ऑपरेशन केले असता या डॉक्टर महोदयांचा काळा प्रताप समोर आला. त्याची सविस्तर माहिती अशी...

घटना नंबर 1: शेवगाव येथील एका महिलेला डमी कस्टमर म्हणून आम्ही पाठवले... संबंधित महिलेला एजेंट च्या माध्यमातून राहाता येथील एका सोनोग्राफी सेंटर वर पाठवले. सदर महिलेने सोनोग्राफी सेंटरला छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व घटनाक्रम चेक केला. त्यानंतर डॉक्टर व त्याचा असिस्टंट यांनी मुलगी असल्याचे सांगितले. व त्यानंतर गर्भ खाली करायचा का अशी विचारना केली. परंतु महिला व तिचा पती यांनी हो असे उत्तर दिले असता राहाता येथील एका मोठ्या दवाखान्यात हा गर्भपात केला जाईल असे सांगितले.  परंतु आणखी अनेक सोनोग्राफी सेंटर चा काळाबाजार उघड करायचा असल्याने आम्ही गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर तेथून पुढे अर्धा किमी च्या अंतरावर एका नामांकित हॉस्पिटल ला असाच लिंग निदान साठी एजेंट च्या माध्यमातून चौकशी केली. तर त्या ठिकाणी देखील लिंग निदान व गर्भपात करून मिळेल असे सांगितलं.. सदर हॉस्पिटल मध्ये आमचा छुपा कॅमेरा पोहचल्या नंतर तेथे देखील आमच्या डमी महिले ने सोनोग्राफी करून घेतली व लिंग निदान केले असता मुलगी असल्याचे सांगितले. गर्भपात करायचा आहे विचारले असता येथेच सोय आहे.. पैसे किती द्यायचे म्हंटलं तर चक्क तीस हजार रुपयाची मागणी केली. परंतु सध्या पैसे नाही असे सांगून दोन दिवसानी येतो असे सांगितले व तेथून काढता पाय घेतला. 

घटना दुसरी : कोल्हार येथील एका दवाखान्यातील नर्सला विस्वासात घेऊन तेथे गर्भापाताचा चाललेला खेळ कॅमेऱ्यात कैद केला तर असाच प्रकार राज्य लेव्हलच्या एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर चा पर्दाफास आम्ही केला आहे. असे जवळपास दहा ते पंधरा केसेस 

सोनोग्राफी सेंटर ते गर्भाची विल्हेवाट पर्यंत व्हिडीओ आम्ही स्टिंग ऑपरेशन च्या माध्यमातून समोर आणला आहे. हे सर्व व्हिडीओ आता आरोग्य विभागावर विस्वास न ठेवता थेट केंद्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान, देशाचे गृह मंत्री, मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते यांना समक्ष भेटून देणार आहोत.

१९९४ चा गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र वापर (गर्भलिंग निदान प्रतिबंध) या कायद्यानुसार गर्भलिंगनिवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंत कैद आणि १०,००० रु. दंडाची शिक्षा होऊ शकते. परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे थोड्याच लोकांना शिक्षा होऊ शकली आहे. गुन्हा सिद्ध करणं हेच सर्वात मोठा आव्हान आहे. कारण गर्भलिंग निदान उघडपणे होत नाही आणि बहुदा दोन्ही पक्षांच्या संमतीने घडत असते. त्यामुळे तक्रार कोण दाखल करणार? असा प्रश्न निर्माण होतो. याचाच गैर फायदा घेऊन या डॉक्टरांनी त्यांचा हा गोरख धंदा मांडला आहे. राजकीय आश्रय तसेच अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध यामुळे या लोकांवर कारवाई होत नाही... विशेष म्हणजे आम्ही या लोकांना पुरावे गोळा करताना मोठं कसब वापरावे लागले आहे पैसे देताना घेताना व्हिडीओ फोटो, सोनोग्राफी करताना, मेल फिमेल सांगतानचा ऑडिओ, गर्भापात करताना व्हिडीओ, गर्भाची विल्हेवाट लावताना व्हिडीओ असे जवळपास तीस ते पस्तीस व्हिडीओ चा पुरावा एका सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन च्या माध्यमातून समोर आणला आहे. 

सदर बातमी युट्युब वर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 










Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच