शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट अपहार

मांडवे बुद्रुक येथील त्या ट्रस्ट संबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर.. संबंधित ट्रस्ट ची झोलझाल समोर आली आहे. करोडो रुपयाचा निधी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून लाटल्याचे समोर.. बघुयात सविस्तर वृत्त सुनील इघे यांनी शिव प्रभात सेवाभावी ट्रस्ट च्या विरोधात उपोषण पुकारले आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, पालकमंत्री धर्मादाय आयुक्त यांना दिले आहे. सदर उपोषण हे 3 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. याच निवेदनाची दखल घेत महसूल प्रशासनाने सदर अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी केली. जागेवर सदर ट्रस्ट ने मोठे अतिक्रमण केल्याचे महसूल पथकाला निदर्शनास आले आहे. आता महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. 

या ट्रस्ट चा आणखी एक बोगस कारभार उघड झाला आहे. मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11मध्ये जागा हस्तानातरित नसताना देखील करोडो रुपयाचा निधी पर्यटन खात्याकडून आणला असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे पत्र राजसत्ता न्यूज च्या हाती लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी यांनी कुठलीही चौकशी न करता या जागेवर टेंडर काढले की खोटे दस्त ऐवज बनवून हा निधी सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतः च्या घश्यात घातला, यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. मांडवे बुद्रुक ग्रामपंचायत ने दिलेला नाहरकत दाखला देखील संशयास्पद आहे. ग्रामपंचायत ने थेट या ट्रस्ट ला ही जागा अतिक्रमीत करण्यासाठी परवानगी दिली हे कृत्य ग्रामपंचायत ने अधिकाराचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते आहे. म्हणजे सरकारी जागेचे वाटप करण्याचा अधिकार ग्रामपंचायत ला दिले का असा प्रश्न निर्माण होत आहे. 

त्यामुळे येणाऱ्या काळात सदर ट्रस्टने लाटलेला निधी कसा मंजूर केला गेला यांची माहिती देखील आपण समोर आणणार आहोत. या ट्रस्ट च्या नावाखाली हा भ्रष्टाचार कोण करतय हे लवकरच समोर येणार आहे. उपोषण कर्ते सुनील इघे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपोषणावर ठाम आहे. संबंधित ट्रस्ट ने सरकारची मोठी फसवणूक केली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत तसेच तत्कालीन तलाठी या सर्वांच्या निष्काळजीपणामुळे ही शासनाची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही असे म्हंटले आहे. 

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच