दरोडा

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे गॅस गोडाऊनच्या घरपोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न

 धाराशिव येथून एक आरोपीसह पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे 130 गॅस टाकींस ताब्यात

 स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची दमदार अशी कारवाई 


 पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस कंपनीचं मोहटादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्या होत्या याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 640/ 2025 बी एन एस कलम 305(अ) ३३१(4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना देण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, व पोलीस अंमलदार दत्तात्रेय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, सुरेश माळी, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, संतोष लोंढे, गणेश धोत्रे, अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाट, बाळासाहेब गुंजाळ, रोहित यमुल, रमीझराजा अत्तार, सुनील मालनकर, भगवान थोरात, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, सागर ससाने, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे, व अरुण मोरे अशांचं पथक नेमून घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास रवाना केलं. या पथकानं गोपनीय व  तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी गुलाब काळे राहणार कासारखणी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी त्याच्या साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव गावचे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पथकाने मिळालेल्या माहितीतील त्या ठिकाणी जाऊन संशयीत आरोपींचा शोध घेत असताना आरोपीस पोलीस पथकाची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून राजेंद्र गुलाब काळे वय 42 राहणार कासारखानी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यास ताब्यात घेतलं. पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्याची साथीदार सुंदर शंकर शिंदे राहणार दसमेगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव, रामा सुबराव काळे, गुलाब गुंपुर काळे, सुनील लगमन पवार,  दत्ता लगमन पवार, लगमन भिसराम पवार, शंकर सुरेश काळे वरील सहा जण हे रा. लक्ष्मी पिढी, तेरखेडा तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. त्याचबरोबर माणिक गुलाब काळे राहणार कासारखणी, तालुका वाशी जिल्हा धाराशिव अशी आरोपींची नावे या आरोपीने सांगितले आहेत. तसेच या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील लक्ष्मण पवार यांच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच 14 सी व्ही 12 12 व रामा सुबराव काळे यांचे सहा चाकी ट्रक, क्रमांक माहित नाही.. अशी वाहने घेऊन मागील दहा दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील एक गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती या आरोपीने दिली चोरलेल्या गॅस टाकींबाबत आरोपीची विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरलेल्या गॅस टाक्या या राहुल हनुमंत चेडे राहणार शिवाजीनगर वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांचे कडे ट्रक खराब झाल्याने त्याच्या हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती सांगितली. पथकानं राहुल हनुमंत चेडे वय वर्षे 38 राहणार शिवाजीनगर वाशी तालुका वाशी, जिल्हा धाराशिव यास टाक्या हजर करणेबाबत कळवले. पथकाने पंचांसमक्ष राहुल हनुमंत चेडे यांनी हजर केलेल्या पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या 130 भारत गॅस कंपन्यांच्या टाक्या तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या  मुद्देमालासह एक आरोपी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास आता पाथर्डी पोलीस स्टेशन हे करत आहे 

Comments

Popular posts from this blog

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरणार: मा.उपसभापती मारुती मेंगाळ

शहरात हाॅटेलवर दोन वेश्यांसह तीन दलाल पकडले....

विखे थोरात वादात कोल्हेंचा गेम.. गणेश कारखाना विखेंकडेच