बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

संगमनेर तालुक्यात शासकीय योजनांची आढावा बैठक संपन्न. थोरातांसह समर्थकांना 'पोटसूळ', मात्र आम जनता 'संतुष्ट'. संगमनेर दि.२८ प्रतिनिधी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदेशीर गुंठेवारी व्यवहारांच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्या आहेत. यासर्व व्यवहारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली. मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय बैठकांचे आयोजन होते. घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये सुरु असलेल्या शासकीय योजनांच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ आणि पदाधिका-यांनी केलेल्या विविध प्रश्नांबाबत गांभिर्याने दखल घेण्याची सुचना या बैठकीमध्ये मंत्र्यांनी दिल्या. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे वरिष्ठ आधिकारी तसेच जेष्ठ नेते वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे...