पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व महिला मेळावा उत्साहात संपन्न.

वॉटर शेड ऑर्गनायझेशन संस्थेचे कार्य कृषी विभागाला दिशादर्शक ठरेल- अभिमन्यू काशीद आष्टी प्रतिनिधी :- वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दांडेगाव तालुका भूम हे गाव संस्थेने दत्तक घेऊन कृषी विभाग जिल्हा उस्मानाबाद व भूम तालुक्याच्या कृषी विभागाच्या सहकार्याने गावामध्ये शेतकऱ्यांसाठी जलसंचय कार्यक्रमांतर्गत गावामध्ये माती व पाणी यावरती मोठ्या प्रमाणावर काम केले गेले. गावामध्ये ५० बोरवेलचे पुनर्भरण केले, त्याचबरोबर ५० शेततळे तयार करण्यात आले, ओढ्यावरती सिमेंट बंधारे बांधण्यात आले, तसेच जाळी बंधारे बांधण्यात आलेे, गावांमधील सामाजिक विकासासाठी महिलांना व पुरुषांना प्रशिक्षण देण्यात आले. अनेक बचत गट तयार करण्यात आले. तसेच परिसरातल्या गावाच्या प्रशिक्षण सहली चे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाली. यामध्ये शेतकऱ्यांचा श्रमदानाचा सहभाग होता परंतु या प्रकल्पाची मुदत संपत आल्याने झालेला बदल या वरती आधारित पौष्टिक तृणधान्य पाककृती स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक व नोडल अधिकारी स्मार्ट प्...