शिवसेना व धनुष्यबाण गेल्यावर उद्धव ठाकरे चा मातोश्रीबाहेर शिंदे व भाजप वर टीकास्र

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना व धनुष्यबाण गेल्याने ठाकरे उद्विग्न संपादकीय : सहदेव भि.जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने सुपूर्द केली आहे. यात धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे ना मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे तर ठाकरे समर्थकांत मात्र मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येत आलिशान गाडीतून समर्थकांना संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान मोदींवर देखील सडकून टिका केली. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं गेलंय, पण त्यांना माहिती नाही त्यांनी मधमाशांच्य...