मविआच्या सभेत बोलणार नाही अजित पवार: अनिल देशमुख आणि जयंत पाटील बोलणार

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 'वज्रमूठ सभा' की 'वज्रफूट सभा' अजित दादा नाराज आज नागपूरमध्ये मविआची सभा होणार आहे. मात्र या सभेत अजित पवार बोलणार नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. नागपूर, 16 एप्रिल : आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला मविआचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेमध्ये अजित पवार बोलणा की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर अजित पवार या सभेत बोलणार नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे. आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांनी बसून ठरवलं होतं की राज्यात सहा ते सात सभा घ्यायच्या. त्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली. आज नागपूरमध्ये दुसरी सभा आहे. सभांना घेऊन माध्यमं विविध बातम्या चालवत आहेत. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालविल्या तर बरं होईल, एका सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच मान्यवर भाषण करतील असं आधीच ठरलं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना अजित...