उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते

मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो: उद्धव ठाकरे संपादकीय: सहदेव जाधव जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. त्यानंतर याच सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. परंतु वेळ निघून गेलेली आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकार आहे तसेच राहील असे दिसून येत आहे. मुंबई, 11 मे : आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल हाती आला आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण विधासभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं की, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचीत सरकार परत आलं असतं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर हे सरकार कदाचित परत आले असते, असं सुप्रीम कोर्टानं आजचा निर्णय देताना म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी ...