शिवशाही फाऊंडेशन भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. प्रा.डाॅ.रिता मालचे सिनेटच्या उमेदवार
.jpg)
प्रा.डाॅ.रिता मालचे मुबंई विद्यापीठ शिक्षक सिनेट निवडणूकीत अपक्ष रिंगणात मुंबई प्रतिनिधी: शिवशाही फाऊंडेशन भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डाॅ.रिता मालचे हे मुबंई विद्यापीठ शिक्षक सिनेट निवडणूकीत अपक्ष रिंगणात उतरले आहेत. डाॅ.रिता मालचे मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय गेली 16 वर्षांपासून मुलांना शिकवत आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय सामाजिक संस्थामध्ये मोठया पदावर काम केले आहे. त्या संशोधक व लेखिका आहेत. गेली 20 वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्या काम करत आहेत. आदिवासी लोकांसाठी त्यांचे मोठे काम आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे व कोणतेही काम उत्कृष्ट रित्या पार पाडणे यात त्यांचा हातखंडा आहे. समाजासाठी काम करणे हा त्याचा स्वभावगुण आहे. समाजात राष्ट्रीयत्व, बंधुता ,न्याय, समता या भावना निर्माण करणे व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. डाॅ. रिता जी प्राध्यापकांच्या हितासाठी व उन्नतीसाठी, विविध प्रश्नांवर आंदोलन व निवेदन देऊन मागण्या विद्यापीठाकडून मान्य करून घेतल्या आहेत. प्राध्यापकांच्या प्रश्नांवर न्याय हक्कासा...